पुणे : मागच्या आठवड्यात आळेफाट्याजवळील अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच जुन्नर तालुक्यातून पुन्हा एकदा भीषण अपघाताची ...
पुणे : मागच्या आठवड्यात आळेफाट्याजवळील अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच जुन्नर तालुक्यातून पुन्हा एकदा भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. इनोव्हा व पीकअपच्या भीषण अपघातात 5 जणांना जीव गमवावा लागला तर एक जण गंभीर जखमी आहे.
हा अपघात माळशेज घाटाजवळ सोमवारी रात्री 10 च्या सुमारास नगर कल्याण मार्गावर घडला आहे. या अपघाताने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. एवढेच नाही तर इनोव्हामधील एयरबॅग तुटून वेगळी झाली होती.
इनोव्हा गाडीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात पीकअप चालक थोडक्यात बचावला.
या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बचाव कार्य सुरू केले. मृतांची नावे अद्याप समोर आली नसून इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती. तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने चालले होते. स्थानिकांच्या मदतीने जखमींना ओतूर येथील सरकारी दवाखान्यात त्यांनी आणले. परंतु त्यातील 5 जणांना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS