सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेसाठी पदवी व पदविका महाविद्यालयातून १९० प्रकल्प समर्थ रुरल ए...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेसाठी पदवी व पदविका महाविद्यालयातून १९० प्रकल्प
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान" या विषयावर
समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकतेच राज्य स्तरीय तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य वीज महावितरण महामंडळाच्या पुणे परिमंडळाचे
मुख्य अभियंता राजेंद्र पवार साहेब यांच्या शुभेच्छा हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आले.
यावेळी मंचर महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर पन्नीकर,पुणे येथील स्मॉल ट्रेनिंग सेन्टर चे उप कार्यकारी अभियंता डॉ.संतोष पटणी,आळेफाटा व जुन्नर उप विभागाचे उप कार्यकारी अभियंता आनंद घुले, मंचर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता जयंत गेटमे, बेल्हे विभागाचे सहाय्यक अभियंता अरुण पवार, आळेफाटा उपविभागाचे कनिष्ठ अभियंता विनायक शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक शेठ घोडके, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर, रा से यो समन्वयक प्रा.विपुल नवले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्प स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातून १९० प्रकल्प आणि ७६७ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कल्पकतेला वाव मिळावा या हेतूने नवनवीन कल्पना, तंत्रज्ञानाची जोड देऊन समाजाभिमुख केलेल्या नवीन कलाकृती आणि यासारखे विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित संकल्पनेचा आविष्कार या कार्यशाळेत दिसून आला.
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण महामंडळाच्या पुणे परिमंडळाचे
मुख्य अभियंता राजेंद्र पवार साहेब विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले कि,वीज ग्राहक म्हणून पुणे विभाग हा सर्वात मोठा झोन असून ३२ लाख ग्राहकांना वीजपुरवठा महावितरणच्या माध्यमातून पुणे आणि पुणे परिमंडळ या विभागामध्ये केला जात आहे. मनुष्य हा कायम विद्यार्थी असतो त्यामुळे शेवटपर्यंत शिकत रहा. नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा.
महावितरण सोबत आपल्या संस्थेने शैक्षणिक सामंजस्य करार करावा त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रकारची माहिती या क्षेत्रामध्ये करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळू शकेल.
महावितरण च्या माध्यमातून आमच्या पुणे येथील ट्रेनिंग सेंटरला विद्यार्थ्यांना भेट देऊन ट्रेनिंग देऊ. तसेच सोलर, विंड, बायोगॅस यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून वीजनिर्मिती करू शकतो काय याबाबत विद्यार्थ्यांनी नवीन प्रकल्प किंवा संशोधन केले पाहिजे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. संतोष पटणी म्हणाले की ग्रामीण विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांची कल्पकता, नवनिर्मिती पाहायला मिळते. दैनंदिन जीवनात आपल्या तांत्रिक कौशल्याचा, शिक्षणाचा उपयोग करून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. तयार केलेले समाजाभिमुख प्रकल्प फक्त महाविद्यालय किंवा स्पर्धेपूरतेच मर्यादित न ठेवता त्याचे पेटंट मध्ये रूपांतर करा. इंजिनियर म्हणजे उत्साह, प्रयत्न, ऊर्जा, कार्यक्षमतेचा अखंड स्रोत असून अर्थव्यवस्था बळकट करणारा समाजातील सर्वात जबाबदार घटक म्हणून त्याकडे पाहिले जाते असे ते म्हणाले.
रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या स्पर्धेच्या पारितोषिका चे स्वरूप होते.
या स्पर्धेसाठी डॉ.व्ही एन पाटील, डॉ.पी डी गुणवरे, डॉ. एम पी नगरकर, प्रा.अमोल काळे, प्रा.गावडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदिप गाडेकर यांनी प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार प्रा.निर्मल कोठारी यांनी मानले.
COMMENTS