कोल्हापूरः आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या आजोबांकडे धावत असताना चिमुकला गाडीखाली आल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना किल्ले पन्...
कोल्हापूरः आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या आजोबांकडे धावत असताना चिमुकला गाडीखाली आल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना किल्ले पन्हाळगडावर घडली आहे.
आई आणि कुटुंबियांसमोरच चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे कुटंबाने काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला होता. इंद्रनील अरुण दबडे (वय 2) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील दबडे कुटूंबीय पन्हाळगड पर्यटनासाठी गेले होते. दबडे कुटुंब चहा पिण्यासाठी तबक उद्यानासमोर थांबले होते. त्या ठिकाणी दबडे परिवाराचे फोटोसेशन सुरु होते. यादरम्यान इंद्रनीलने आपल्या आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे उभे असलेले आजोबांकडे धाव घेत असताना सुधीर कुमार हांडे (रा. करमाळा, जि. सोलापूर) याची सज्जाकोटीकडून येणारी कार (एमएच- 45-एएल 6203) भरधाव येत असताना इंद्रनील कारच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली आला.
मोटारीचे मागील चाकही इंद्रनीलच्या डोक्यावरून गेले यामध्ये तो अत्यंत गंभीर जखमी झाला. यावेळी स्थानिकांच्या मदतीने इंद्रनीलला पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये येथे नेण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. यावेळी दबडे कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
COMMENTS