क्राईमनामा Live : जुन्नर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण केले असल्याचे पत्र सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग जुन्नर यांन...
क्राईमनामा Live : जुन्नर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण केले असल्याचे पत्र सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग जुन्नर यांना राष्ट्रवादी जीप चालक संघटना पश्चिम विभाग यांच्या वतीने देण्यात आले आहे.
सदर जागा हि सार्वजनिक बांधकाम विभागाची असून येथे तलाठी कार्यालय शेजारी व विद्युत महावितरण कार्यालय आहे.
सदर जागेवर २५ वर्षांपासून जुन्नर - आपटाळे या जीप उभ्या केल्या जात आहेत मात्र सध्या येथे अनधिकृतपणे कुणाचीही परवानगी न घेता पक्के बांधकाम केले जात आहे, त्यामुळे नाईलास्तव जीपा या मुख्य रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टीची सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत दखल घ्यावी अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी जीप चालक संघटना पश्चिम विभाग यांच्या वतीने देण्यात आले आहे.
COMMENTS