आरोग्य टिप्स : 'ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होणे, मुडदूस, स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, ...
आरोग्य टिप्स : 'ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होणे, मुडदूस, स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, थकवा, दंतक्षय, त्वचारोग यांसारख्या समस्या निर्माण होतात.
रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे 'ड' जीवनसत्त्वाचे महत्वाचे काम आहे. कोवळ्या उन्हातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. या व्यतिरिक्त काही पेयांच्या सेवनानेही शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. जाणून घ्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे -
संत्री ज्यूस
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी सोबत कॅल्शियम देखील असते. विशेष म्हणजे डी व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आहारात संत्री ज्यूसचा समावेश करावा.
दूध
दुधाला पूर्ण अन्न म्हणतात. व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आणि हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित दूध अवश्य प्यावे.
दही, ताक
दही आणि ताकामध्ये प्रोटीन सोबतच व्हिटॅमिन डी देखील आढळून येते.
गाजराचा रस
गाजराच्या रसमध्येही व्हिटॅमिन सी आणि डी आढळते. गाजराचा रस नियमित पिल्याने रक्तही वाढते.
सोयाबीन दूध
सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. ज्या लोकांना दूध आवडत नाही ते सोयाबीन दुधाचे सेवन करू शकतात.
COMMENTS