आरोग्य टिप्स - उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा.. अनेकांना या घामामुळे त्वचेसंबंधित विकार होतात. सहसा मानेवर , पाठीवर अनेकांना घामोळे येतात. त...
आरोग्य
टिप्स - उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा.. अनेकांना या घामामुळे त्वचेसंबंधित विकार
होतात. सहसा मानेवर, पाठीवर
अनेकांना घामोळे येतात. त्यामुळे अंगावर कपडे घातले की कपडू टोचू लागून अस्वस्थ
झाल्यासारखे वाटू लागते. परंतु आपले पुर्वजांपासून सुरू असलेले उपाय यावर अत्यंत
प्रभावी आहेत.
कोरफड
घामोळे
आलेल्या जागी कोरफड लावल्याने आराम मिळतो. कोरफड लावल्यानंतर अर्ध्या तासानंतर थंड
पाण्याने धुऊन टाका. यामुळे बराच थंडावा मिळतो.
कैरी
कच्ची
कैरी गॅसवर ठेवून भाजून त्याचा गर काढून तो फ्रीजमध्ये ठेवून द्या. थंड झाल्यावर
हा गर शरीरावर लावा. काहीवेळाने धुऊन टाका. या उपायाने घामोळ्यांपासून आराम मिळतो.
चंदन पावडर
घामोळे
घालवण्यासाठी चंदन उपयुक्त आहे. त्वचेला थंडावा देण्याबरोबरच खाजही चंदनामुळे कमी
होते. दोन चमचे चंदन पावडरमध्ये ४ ते ५ चमचे गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा.
घामोळे झालेल्या जागेवर ही पेस्ट लावा. त्याचप्रमाणे चंदन पावडर आणि धणे पावडर
समप्रमाणात घेऊन त्यात गुलाबपाणी मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करून हा लेप
घामोळ्यांना लाव्याने आराम मिळेल.
मुलतानी माती
मुलतानी
मातीमध्ये अँटीमायक्रोबियल्स गुणधर्म असतात. तसेच मुलतानी माती त्वचेला थंडावाही
देते. मुलतानी मातीचा लेप लावल्यास उष्णतेमुळे उठलेलं पुरळ कमी होतं. एक चमचा
मुलतानी मातीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घामोळे आलेल्या जागेवर
लावा. लेप सुकल्यानंतर तो धुवून टाका.
दही
दह्यामध्ये
अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. दही फेटून ते घामोळे झालेल्या जागेवर लावा. १५ ते
२० मिनिटांनंतर धुऊन टाका. दररोज दिवसातून एकदा हा लेप लावू शकता.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित
ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)
COMMENTS