आरोग्य टिप्स : पाण्यात लिंबाचा रस मिसळून चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील सगळी धूळ निघून जाऊन चेहरा अधिक टवटवीत वाटतो. चेहऱ्यावर बर्फ फिरवल...
आरोग्य टिप्स : पाण्यात लिंबाचा रस मिसळून चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील सगळी धूळ निघून जाऊन चेहरा अधिक टवटवीत वाटतो.
चेहऱ्यावर बर्फ फिरवल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि चेहरा फ्रेश दिसतो. चेहऱ्यावर बर्फ लावताना चेहऱ्याला डायरेक्ट लावू नये. बर्फाचा खडा सुती कापडामध्ये गुंडाळून चेहऱ्याला लावावा.
चेहऱ्याला कोरफड जेल किंवा कोरफडीच्या गराने ५ मिनिट मसाज करावा.
फेसवॉशमध्ये एक चमचा कॉफी मिसळून चेहऱ्याला लावावे. ५ मिनिटांनी चेहरा धुवावा.
एलोवेरा जेलमध्ये गुलाबपाणी मिसळून फ्रिजमध्ये ठेवून त्याचे आईस क्युब बनवा. आईस क्यूबने चेहऱ्यावर मसाज करा.
चेहऱ्याला मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. यामुळे त्वचा निरोगी आणि फ्रेश बनते.
चेहऱ्यावर गुलाबजल लावावे.
बदाम तेलाने चेहऱ्याला मसाज करावा.
बेसन पीठ आणि हळदीमध्ये दूध मिसळून हा फेसपॅक चेहऱ्याला लावावा. फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा धुवावा.
COMMENTS