आरोग्य टिप्स : मलबेरी फ्रुटला (Mulberry fruit) मराठीमध्ये तुतीचे फळ म्हणतात. रेशीम उद्योगामध्ये या वनस्पतीचा फार मोठा उपयोग होतो. मात्र या...
आरोग्य टिप्स : मलबेरी फ्रुटला (Mulberry fruit) मराठीमध्ये तुतीचे फळ म्हणतात. रेशीम उद्योगामध्ये या वनस्पतीचा फार मोठा उपयोग होतो. मात्र या वनस्पतिविषयी खूप कमी लोकांना माहिती असेल. बाजारातही मलबेरी फ्रुट क्वचितच विक्रीस दिसते. मलबेरी फ्रुट अनेक पोषक तत्वांनी युक्त असून आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घ्या मलबेरी फ्रुट खाण्याचे फायदे
शरीरातील उष्णता कमी होते
मलबेरी फ्रुट खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.
भूक वाढीसाठी उपयुक्त
मलबेरी फ्रुट भूक वाढीसाठी उपयोगी आहे. भूक मंद झाल्यास झाल्यास मलबेरी फ्रुट खावे.
घशाची कोरड कमी करते
उन्हाळ्यात सारखी तहान लागत असते. तसेच ताप आल्यावर घसा कोरडा पडतो. मलबेरी फ्रुटमुळे घशाची कोरड कमी होते.
रक्त शुद्ध होण्यास मदत करते
मलबेरी फ्रुट खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. मलबेरी फ्रुट रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक
मलबेरी फ्रुट खाल्ल्याने दृष्टी सुधारते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
मलबेरी फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त
मलबेरी फ्रुटमध्ये बीटा कॅरोटीन असते. त्यामुळे तुमची त्वचा तरुण राहते.
हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
मलबेरी फ्रुटमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे मजबूत आणि बळकट बनतात. शिवाय हाडांच्या ऊतींचे मजबुतीकरण आणि संवर्धन होते.
टीप : मलबेरी फ्रुट नेहमी ताजीच खावीत कारण त्यात पोषक घटक अधिक असतात.
COMMENTS