सतिश शिंदे मुख्य संपादक जुन्नर तालुक्यातील मौजे. सांगणोरे ता. जुन्नर जि. पुणे येथे रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे ...
सतिश शिंदे मुख्य संपादक
जुन्नर तालुक्यातील मौजे. सांगणोरे ता. जुन्नर जि. पुणे येथे
रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्ववंदनीय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
कार्यक्रमप्रसंगी सकाळी ९ वाजता धम्मध्वज पुजा, बुध्द पुजापाठ
बौध्दाचार्य आयु. अर्जुन सोनवणे सर (श्रामणेर), आयु. संजय धोत्रे, आय़ु. कैलास साळवे
( पिंपळगाव जोगा), आयु. नितिन साळवे यांच्या वतीने संपन्न झाला. सकाळी ९.३० झेंडावंदन
हस्ते – समता सैनिक दल जुन्नर तालुका यांच्या वतीने करण्यात आले. सकाळी १० वाजता भाषण
स्पर्धा आयोजक तक्षशिला सामाजिक प्रतिष्ठाण मौजे सांगणोरे यांच्या माध्यमातून आयोजित
केली होती.
सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणूक ( प्रतिमा – भगवान गौतम बुध्द,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा
फुले, बिरसा मुंडा ) यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
रात्री ९ वाजता जाहिर सभा आयोजित केली होती, या कार्यक्रमप्रसंगी
प्रमुख वक्ते आयु पोपट सखाराम राक्षे अध्यक्ष जुन्नर तालुका आर. पी. आय. होते, आयु.
संभाजी साळवे ज्येष्ठ समाजसेवक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मारूतीराव दगडूशेठ भालचिम
( पोलिस पाटील सांगणोरे हे होते.
यावेळी आकांक्षा शिंदे या विद्यार्थीनीने डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या जीवनावर भाषण केले, मधुकर लवांडे, संजय धोत्रे, पोपट राक्षे, संभाजी
साळवे या मान्यवरांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मारूतीराव भालचिम यांनी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर भाष्य केले.
कार्यक्रमप्रसंगी मधुकर लवांडे, संजय धोत्रे, कैलास साळवे,
अर्जुन सोनवणे, अनंत सोनवणे, प्रविण लोखंडे, सुरेश माळवे, संपत खरात, चंदू इनामदार,
बन्सी विरणक ( ग्रा. सदस्य सांगणोरे ), सतिश शिंदे ( पत्रकार ), गौतम धोत्रे, देवराम
पवार, अनिताताई शिंगाडे ( सरपंच सांगणोरे ), दिगांबर लोहकरे ( उपसरपंच ), सुरेखाताई
अर्जुन मोरे ( सदस्य ), भाऊसाहेब साबळे ( सदस्य सांगणोरे ), रामदास घोडे ( सदस्य ),
संगिताताई उंडे ( सदस्य ), आशा मिलखे ( सदस्य ), प्रभाकर खरात ( तं. मुक्ती अध्यक्ष
), भरत मोरे ( पत्रकार ), सुभाष मोरे ( पोलिस ), अर्जुन मोरे ( सा. कार्यकर्ते ),
गणेश मोरे ( सा. कार्यकर्ते ) हे प्रमुख उपस्थित मान्यवर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आयु. तुषार कदम, महेंद्र कदम यांनी
केले.
यानंतर भोजन व रात्री १० वाजता स्वरांजली प्रस्तुत नजराणा
सप्तसुरांचा पॉप शो ऑर्केस्ट्रा पार पडला.
तक्षशिला सामाजिक प्रतिष्ठाण रजि मंडळ सांगणोरे.
समस्त ग्रामस्थ व महिला मंडळ सांगणोरे पुणेकर व मुंबईकर मंडळी.
COMMENTS