रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका यांच्या वतीने जुन्नर तहसिल कार्यालयासमोर गुरूवार दि. 20 धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जुन्न...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका यांच्या वतीने
जुन्नर तहसिल कार्यालयासमोर गुरूवार दि. 20 धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी शासनाच्या
आदेशाचे पालन न करता मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या एकाही वस्तीला भेट देऊन तेथील
कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडविलेले नाहीत.
जुन्नर तालुक्यातील 75 झोपडपट्ट्यांचे गायरान जमिनीत अतिक्रमण
झाल्याचे अतिक्रमण रजिस्टरमध्ये गावकारमगार तलाठी यांनी नोंद केलेली नाही, अशा प्रकारच्या
विविध मागण्या आहेत.
यावेळी जुन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका
अध्यक्ष पोपट राक्षे, उपाध्यक्ष संभाजी साळवे, सुरेश खरात, युवा अध्यक्ष प्रविण लोखंडे,
विजय बनकर, महादेव मंजुळकर आदी या धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
COMMENTS