क्राईमनामा Live : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी, जारकरवाडी, लाखनगाव, वाळुंज, खडकवाडी, धामणी, देवगाव परिसरात शनिवारी सायंकाळ...
क्राईमनामा Live : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी, जारकरवाडी,
लाखनगाव, वाळुंज, खडकवाडी, धामणी, देवगाव परिसरात शनिवारी सायंकाळी 5.30 मि. झालेल्या
अवकाळी पाऊस व गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
झाले आहे.
यात काही गारा या लिंबाच्या आकाराच्या होत्या, गारांच्या
तडाख्यामुळे या भागातील काढणीस आलेल्या गहू, कांदा, मका, टोमॅटो, वांगी, मिरची, भूईमूग
व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यात हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे
शेतकरी वर्गाला याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी खरेदी
विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.
सरपंच - अनिल वाळुंज
COMMENTS