अलवर (राजस्थान) : पती प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीसह तीन मुलांची निर्घृण हत्या केल्याची घटना 2 ऑक्टोब...
अलवर (राजस्थान) : पती प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीसह तीन मुलांची निर्घृण हत्या केल्याची घटना 2 ऑक्टोबर 2017 रोजी घडली होती.
या प्रकरणी न्यायालयाने या महिलेसह तिच्या प्रियकराला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
संतोष ऊर्फ संध्या नावाच्या महिलेने तिचा प्रियकर हनुमान प्रसाद याच्या मदतीने पती बनवारी, मोठा मुलगा अमनसह दोन मुलांची गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. या हत्येप्रकरणी न्यायालयाने संतोष आणि हनुमान प्रसादला दोषी ठरवले आहे. संतोष आणि हनुमान प्रसाद हे एकत्र तायक्वांदोचं प्रशिक्षण घेत होते. त्यादरम्यान या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. तीन वर्षांपर्यंत या दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. संतोष आणि हनुमान प्रसाद यांच्या प्रेमसंबंधाची माहिती पती बनवारीला समजली. त्यावरून अनेकदा त्याची पत्नीसोबत भांडणं झाली होती.
संतोषने रोजची भांडणं आणि मारहाणीला कंटाळून हनुमानच्या मदतीने कुटुंबीयांची हत्या करण्याचा कट रचला होता. 2 ऑक्टोबर 2017 रोजी संतोषने प्रियकराच्या मदतीने तिचा पती, तीन मुले आणि एका भाच्याची निर्घृण हत्या केली. हत्येपूर्वी आरोपी महिला संतोष हिने कुटुंबीयांच्या रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर तिने घराचा दरवाजा उघडला. त्या वेळी तिचा प्रियकर हनुमान प्रसाद आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी घरात प्रवेश केला. सर्वप्रथम या तिघांनी संतोषचा पती बनवारी आणि तिचा मोठा मुलगा अमन याची चाकूने गळा चिरून हत्या केली. यावेळी अन्य दोन मुलं झोपेतून जागी होत असल्याचं दिसताच त्यांनी या दोन्ही मुलांचीदेखील गळा चिरून हत्या केली.
या वेळी संतोष पायऱ्यांवर उभी राहून सर्व घटनाक्रम पाहत होती. या हत्येप्रकरणी न्यायालयाने पाच वर्षांनंतर संतोष आणि हनुमान प्रसादला दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
COMMENTS