पटना (बिहार) : स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 इथल्या एक टीव्हीवर अचानक ब्लू फिल्म सुरू झाली आणि जवळपास 3 मिनिटे ही फिल्म सुरू होती. यानंतर...
पटना (बिहार) : स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 इथल्या एक टीव्हीवर अचानक ब्लू फिल्म सुरू झाली आणि जवळपास 3 मिनिटे ही फिल्म सुरू होती. यानंतर एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 इथल्या एक टीव्हीवर सकाळी 9 च्या सुमारास अचानक ब्लू फिल्म सुरू झाली. जवळपास 3 मिनिटे ही फिल्म सुरू होती. यानंतर एक गोंधळ उडाला. शिवाय, प्रवाशांना मोठा धक्का बसला. काही प्रवाशांनी तर त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. एक प्रवाशाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) या दोघांनीही घटनेनंतर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
COMMENTS