जुन्नर तालुक्यातील पहिला आयर्नमॅनचा पटकावला मान जुन्नर :- जुन्नरवासीय राहुल अनिल पुराणिक याने नुकत्याच झालेल्या *आफ्रिकन आयर्नमॅन चॅम्पिअन...
जुन्नर तालुक्यातील पहिला आयर्नमॅनचा पटकावला मान
जुन्नर :- जुन्नरवासीय राहुल अनिल पुराणिक याने नुकत्याच झालेल्या *आफ्रिकन आयर्नमॅन चॅम्पिअनशिप ह्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत यश संपादन केले.* आयर्नमॅन हि स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ या शहरात ५ मार्च २०२३ रोजी पार पडली. एकूण जगभरातून ३००० स्पर्धक आणि त्यातल्यात्यात भारतातून केवळ ३-४ खेळाडू सहभागी झाले होते.
*आयर्नमॅन म्हणजे काय?*
आयर्नमॅन हि एक जागतिक क्रीडा संघटना आहे कि जी ट्रायथलॉन हि स्पर्धा आयोजित करते. ट्रायथलॉन या खेळात एकूण ३ प्रकारचे खेळ असतात.... पोहणे , सायकल , धावणे असे तिन्ही खेळ सलग एका विशिष्ट वेळ मर्यादेत पूर्ण करते लागतात आणि त्यालाच आयर्नमॅन नावाचा किताब मिळतो.
आयर्नमॅन ७०.३ मैल आणि आयर्नमॅन असे दोन प्रकार.
*आयर्नमॅन ७०.३ मैल* - १.९ किमी पोहणे ९० किमी सायकल २१.१किमि धावणे तेही ८.३० तासात . राहुलने
हि स्पर्धा नोव्हेंबर २०२२ साली गोवा येते पूर्ण केली होती. या स्पर्धेला हाल्फ आयर्नमॅन असेही म्हणतात.
*आयर्नमॅन (१४०.६ मैल/फुल)* - ३.८ किमी पोहणे , १८०किमि सायकल, ४२.२ किमी धावणे तेही १७ तासात.
आयर्नमॅन (१४०.६ मैल/ फुल ) या स्पर्धेला जगातील अतिशय अशा कठीण एकदिवसीय खेळ म्हणून मानलं जात आणि या खेळात शारीरिक बरोबर मानसिक क्षमता सुद्धा पणाला लागते. दक्षिण आफ्रिकेतील जोराचा पाऊस , १५ डिग्री थंड तापमान , समुद्रालगतच्या खडतर घाट आणि तुफान वारा अश्या अवघड वातावरणात राहुलने आयर्नमॅन (१४०.६ मैल/फुल ) हि स्पर्धा १३ तास ४१ मिनिटात पूर्ण केली आणि जुन्नर तालुक्यातील पहिला आयर्नमॅन होण्याचा मान पटकावला. ३००० स्पर्धाकांपैकी फक्त ८०० स्पर्धक या १४०.६ मैल स्पर्धेत सहभागी झाले होते आणि उरलेले २२०० स्पर्धक ७०.३ मैल.
आयर्नमॅन हि तशी कठीण स्पर्धा आणि त्यासाठी लागणारी मेहनत हि तेवढीच कठीण आणि महत्वाची. या स्पर्धेसाठी राहुलने आठवड्यात २०-२५ तासाचा सराव केला. तिन्ही खेळ आणि त्यांचे ठराविक दिवस यांचा मेळ घालणं तस खडतरच. त्यातल्या त्यात रविवार हे मोठे ८-१० तासाचे. त्यामध्ये सायकल ६-७ तास आणि धावणे २-३ तास .
राहुलचा हा प्रवास तास २०१९ पासून सुरु झालेला. सतत शारीरिक क्षमतेच्या खेळातील रुची आणि आहार नियोजन या सगळ्या गोष्टींचा मेळ घालत हे यश संपादन केले. राहुलने आजपर्यंत विविध प्रकारच्या मॅरेथॉन, ट्रायथलॉन, स्वीमॅथोन अश्या प्रकारच्या खेळात यश मिळवले आहे. खेळातून जुन्नर तालुक्याचे नाव जागतिक पातळीवर पोहचवण्याचा मानस व्यक्त केला आणि भविष्यात जुन्नर शहरात खेळासाठी योगदान देण्याची तयारी दर्शिवली.
राहुल एका खासगी कंपनीत नोकरी आणि कुटुंब सांभाळत त्याची खेळाची आवड जोपासतोय आणि या सगळ्यात त्याच्या पत्नीचा- माधुरीचा मोलाचा वाटा आहे आणि तसेच पालकांनी नेहमीच प्रोत्साहन देत त्याला पाठिंबा दिला.
राहुलचे प्रशिक्षक - चैतन्य वेल्हाळ आणि त्यांची पॉवरपिक्स अकादमी चे मार्गदर्शन हे सुद्धा तितकेच महत्वाचे.
COMMENTS