सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जि.प.प्रा. शाळा खामगाव शाळेस प्लॅनेट वॉटर व सायलेम कंपनी याचे सहकार्याने 1000 लिटर क्ष...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जि.प.प्रा. शाळा खामगाव शाळेस प्लॅनेट वॉटर व सायलेम कंपनी याचे सहकार्याने 1000 लिटर क्षमतेचा वॉटर फिल्टर देण्यात आला. यावेळी डॉ. सुर्या मोहपात्रा व डॉ. मोर्निया मोहपात्रा (अमेरिका) हे प्रमुख पाहणे म्हणुन उपस्थित होते. त्याच बरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.अशोकदादा घोलप (व्हा. चेअरमन विघ्नहर सह. साखर कारखाना) हे होते. खामगाव शाळेतील मुलांकरीता शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून प्लॅनेट वॉटर यांच्या सहकार्याने फिल्टर देण्यात आला. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या डॉ. सूर्या मोहपात्रा डॉ. मोनिया मोहपात्रा व टिम प्लॅनेट वॉटर यांचे मोठ्या उत्साहात बैलगाडीत, फेटा बांधुव ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. वॉटर फिल्टरचे उद्घाटन डॉ. सूर्या मोहपात्रा, मोर्निया मोहपात्रा,
श्री.अशोकदादा घोलप, श्री. भालिंगे साहेब श्री.लांडे सर, श्री. गांगर्डे सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
श्री अशोकदादा घोलप हे होते तर प्रमुख पाहुणे डॉ. मोहपात्रा व मोर्निया मोहपात्रा हे होते.
प्रमुख पाहूण्यांनी आपल्या मनोगतात खामगाव ग्रामस्थांच्या आदरातिथ्याने मी भारावुन गेलो असल्याचे मत व्यक्त केले. खामगाव शाळेत व गावात मला पुढील काळात पुन्हा येण्याची इच्छा असून मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून हा फिल्टर दिल्याचे मत व्यक्त केले. शिवजन्म भूमीत येऊन मला आनंद झाला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री.अशोकदादा घोलप यांनी खामगाव हे जिल्ह्यातील आदर्शवत गाव असुन आपण गावास पुन्हा नक्की भेट देण्याचे आमंत्रण दिले. शाळेतील मुलांसाठी खामगाव नेहमी अग्रेसर असल्याचे मत व्यक्त केले
कार्यक्रमाच्या वेळी श्री.अजिंक्य घोलप (उपसरपंच खामगाव)
श्री. गिरीधर काका नेहरकर
श्री.राममामा पठारे, श्री.अतुलशेठ घोलप, श्री.संतोष पठारे, श्री.दशरथ घोलप, महेश घोलप, अंकुश घोलप, सुशिल घोलप, सत्यवान जगताप, विनोद पठारे,
परशुराम पठारे, रेश्माताई घोलप, आरती डोके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या फिल्टर करीता प्रकल्प प्रमुख
श्री. चैतन्य कुसूरकर यांनी मोलाचे योगदान दिले. तर शाळेतील उपक्रमशिल शिक्षक श्री. अंकुश कोकणे सर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमांचे नियोजन
श्री. लांडे सर, श्री. गांगुर्डे सर यांनी केले.
प्रस्ताविक श्री. विनायक खोत सर, तर सुत्र संचालन श्री. लोहकरे व गवते सर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमचि नियोजन सौ. भोर मॅडम, सौ. मुंढे मॅडम , श्री. लोहकडे सर व श्री. कोकणे सर यांनी केले.
कार्यक्रमास खामगाव गावातील महिलावर्ग, तरुण मंडळ ग्रामस्थ, विविध संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS