न वी दिल्ली : लष्करात तैनात असलेले नाईक अनिश कुमार सिंह (रा. अंबाला, केरळ) यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घट...
नवी दिल्ली : लष्करात तैनात असलेले नाईक अनिश कुमार सिंह (रा. अंबाला, केरळ) यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते सुट्टीसाठी आपल्या घरी गेले होते.
1 फेब्रुवारी रोजी ते अंबाला कॅन्टोन्मेंट लालकुर्ती येथील हॉटेलमध्ये थांबले, त्यानी हॉटेलवाल्यांना आपली खोली दोन दिवसांसाठी बुक करण्यास सांगितले.
1 फेब्रुवारीपासून ते या हॉटेलमध्ये थांबले होते. खोली बंद असल्यामुळे हॉटेल मालकाने दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही आवाज न आल्यामुळे हॉटेलमधील लोकांना संशय आला. दरम्यान याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. लष्कर आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा जवानाचा मृतदेह बाथरूमच्या ग्रीलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
हॉटेल मालकाने सांगितले की, अनिश कुमार सिंगने रूम बुक करताना सांगितले होते की, त्याला दोन दिवस हॉटेलमध्ये राहायचे आहे आणि दोन दिवसांनी केरळला जाण्याची फ्लाइट आहे. दोन दिवसांनी जवानाने रूमचे बुकिंग वाढवले. मंगळवारी सकाळी अनिश कुमार सिंग यांना खोली रिकामी करायची होती, मात्र ते खाली न आल्याने हॉटेल व्यवस्थापनाकडून वरच्या मजल्यावर जाऊन पाहणी केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.
लालकुर्ती पोलिस चौकीचे पोलिस हॉटेलवर पोहोचले त्यांनी लष्कर पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आधारकार्ड तपासल्यानंतर पोलिसांनीही आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पडवळ पोलिस ठाण्याचे एसएचओ जीत सिंग पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वरच्या मजल्यावर जाताना हॉटेलच्या रुम क्रमांक 203 मध्ये जवानाने बाथरूमच्या स्कायलाइटला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS