विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशा...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार
राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरु असून त्यामध्ये श्री शिव छत्रपती महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले असून आमच्या सर्व प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्यात . अन्यथा आम्ही सर्व कर्मचारी २० फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाऊ अशी भूमिका स्थानिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तेजस शिंदे यांनी घेतली आहे .
प्रमुख मागण्या-
1. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करणे
2. दहा, वीस, तीस लाभ योजना लागू करणे
3. सातवा वेतन आयोग लागू करून वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे
4. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे
5. सन 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे
6. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार सातवा वेतन आयोग लागू करणे
आंदोलनाचे टप्पे-
1. दि.2 फेब्रुवारी 2023 पासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार
2. दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी दु.2 ते 2.30 या अवकाश काळात निदर्शने
3. दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी काळ्या फीती लावून कार्यालयीन काम करणे
4. दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप
5. दि.20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संप
COMMENTS