मुंबई : होळीच्या सणाआधीच एलपीजी सिलिंडरने महागाईची आग भडकवली आहे. भारतीय इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, १ मार्चपासून घरगुती ग...
मुंबई : होळीच्या सणाआधीच एलपीजी सिलिंडरने महागाईची आग भडकवली आहे. भारतीय इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, १ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे (Cylinder) दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहे.
याशिवाय १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
गॅस सिलिंडरचे नवीन दर काय?
सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आल्याने मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता १ हजार १०२ इतकी झाली आहे. दरम्यान, एलपीजी गॅसच्या किमतीत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्यात वाढ करण्यात आल्याने गृहिणींचे बजेट आता कोडलमडणार आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर पाठोपाठ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल ३५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर २ हजार ११९ इतके झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, गेल्या चार महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या नव्हत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर महागाईपासून दिलासा मिळेल अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने या आशेवर पाणी फेरले गेले आहे.
COMMENTS