राजमान्यकवी श्री खंडू रघुनाथ माळवे-खरमा तथा डॉ खं र माळवे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ सन 2013 काव्यसंग्रह प्रका...
राजमान्यकवी श्री खंडू रघुनाथ माळवे-खरमा तथा डॉ खं र माळवे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ सन 2013 काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला त्याचप्रमाणे नुकताच स्नेह संयोग या संस्थेने दि. 19/2/2013 रोजी बालसाहित्य ( अंगाईत) साहित्यिक राम नेमाडे यांचे हस्ते डोंबिवली येथे प्रकाशन करण्यात आले. बारा पाणी पुस्तक असून आपणास सांगताना अतिशय आनंद होत आहे की विना सहकार नही उध्दार या तत्वप्रणाली नुसार पुस्तक रूपाने आपणास भेटत आहोत मागणीनुसार तिसरी आवृती तुमच्या हाती देताना आम्हास परम आनंद होत आहे. मराठी भाषेचा उगम कोठून होतो! आतड्यांना पिळ पडल्यावर जो आवाज बाहेर पडतो तेथून भाषेचा उगम होतो. त्यातील काही प्रकार वंदना, अंगाईत, प्रार्थना, ओवी, श्लोक, पुण्यकर्म, होरा, गोंधळ, जागरण, भारूड, अभंग, भजन, मदारी, आपल्या हाती देत आहेत.
सुप्रसिद्ध कवी डॉ खं र माळवे महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष. मुंबई वृत्तपत्र लेखक संघ सल्लागार तसेच पत्रकार उत्कर्ष समितीवर कार्यरत आहेत.
साप्ताहिक स्नेह संयोग आणि लोकसत्यवाणी न्यूज यांच्या वर्धापन दिना निमित्त डोंबिवली येथिल गणेश मंदिर हाॅल येथे कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा डॉ राम नेमाडे सर तसेच पुस्तक प्रकाशक संतोष सावंत प्रमुख अतिथी विलास खानोलकर, डॉ सुनिल खर्डिकर, प्रकाश भोईर, सौ राजश्री काळे (अभिनेत्री) पंढरीनाथ भालेराव, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) सुभाष झेंडे (जेष्ठ साहित्यिक प्रकाशक), यादी मान्यवर व कविगण अनंत बोरसे (पत्रकार) सशिकांत सावंत राम मेश्री, दत्ता गोसावी, कृष्णा बाने, प्रविन पालकर, विलास देवळेकर, सुनिल दातार, संजय पवार, प्रेमानंद जगताप, डॉ राजू माने, मदन सुर्यवंशी, उत्तम जाधव, रूचिता विचारे, प्रकाश माळी, प्रविन बेटकर, राजेंद्र सावंत, यादी मान्यवरांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देवून गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अखेरिस संतोष सावंत यांनी आभार मानले.
शब्दांकन- डॉ खं र माळवे
महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती-उपाध्यक्ष
COMMENTS