आरोग्य टिप्स : केळी खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील थकवा निघून जातो. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर्स असतात....
आरोग्य टिप्स : केळी खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील थकवा निघून जातो.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याकरता केळी खाणे उपयोगी आहे. केळीमध्ये थायमिन, फॉलिक ऍसिड आणि लोह मोठ्या प्रमाणात असते.
केळीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी नियमित केळी खावी.
केळीमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे पचनसंस्थेसंबंधी व आतड्यांसंबंधी आजारांमध्ये केळी गुणकारी आहे. बद्धकोष्ठता आणि मलावरोधाची समस्या असेल तर केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.
जेवणानंतर केली खाल्ल्यास वजन वाढण्यासाठी उपयुक्त ठरतात. वजन वाढत नसेल तर आहारात केळीचा समावेश करावा.
केळी खाल्ल्यामुळे स्त्रियांचे मासिक चक्र व्यवस्थित राहण्यास मदत होते.
केळी खाण्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
केळीत असणाऱ्या व्हिटॅमिन बी-6 आणि ट्रायफोटोपणमूळे मेंदू शांत राहतो. यामुळे डिप्रेशन किंवा तणावात असणाऱ्या लोकांना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.
केळीमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.
COMMENTS