क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे बोतार्डे येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी अतिशय खेळीम...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे बोतार्डे येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या ग्रामसभेला बोतार्डे गावचे सरपंच सौ. वंदना डोळस, उपसरपंच
राहूल आमले, सदस्य जनार्दन मरभळ, सदस्य संतोष मरभळ, सदस्या हिराबाई मरभळ, सदस्या नलिनी तलांडे, सदस्या
सुलोचना मरभळ, सदस्या रंजना गांगड तसेच भाऊसाहेब असवले यांच्या उपस्थितीत ग्रामसभेला
सकाळी ११ वाजता सुरूवात झाली.
१)ग्रामसभेत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत सहभागी होऊन
निकषांची पूर्तता करणे.
२) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ४९
अन्वये ग्रामविकास समित्यांची स्थापना करणे.
३)घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीबाबत चर्चा करणे पाणीपट्टीचे
दर फेर आकारणी करणे.
४) १५ वा वित्त आयोग सन २०२३/२०२४चा वार्षिक आराखडा मंजुरी
घेणे.
५) ५ टक्के पेसा अबंध निधी अंतर्गत सन २०२२/२३व २०२३/२४
चा आराखडा बनवणे.
६) प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री
आदी आदर्श ग्राम योजनांचा कृती आराखडा तयार करणे.
७) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत
समृध्दी लेबर बजेट २०२३/२४ची पूर्तता व पुरवणी लेबर बजेट २०२२/२३कार्यवाही करणे.
८) शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे व ९ संकल्पना राबविणे बाबत
नियोजन करणे.
९) माझी वसुंधरा अभियान नियोजन करणे.
१०) विविध विकासकामांचे प्रस्ताव पाठविणे.
११) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे बाबत.
१२) अमृत महा आवास अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना निर्णयाप्रमाणे
लाभ देणे.
१३) ऐनवेळी मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय.
वरील विषयाला अनुसरून ही ग्रामसभा पार पडली.
या ग्रामसभेमध्ये विविध विकासकामांच्या बाबतीमध्ये ग्रामस्थांनी
मांडलेल्या विषयांना स्थान देत न्याय देण्याचे काम अध्यक्षांच्या परवानगीने केले गेले.
सभेत ग्रामविकास समित्यांच्या स्थापनेमध्ये आज पेसा अध्यक्षपदासाठी
जवळजवळ पुरूष अर्ज ५ व स्त्री अर्ज बिनविरोध १ आलेला होता. यामध्ये चिठ्ठी पध्दतीने अमोल सखाराम मरभळ यांच्या नावाची
चिठ्ठी आली व त्या पदावर अध्यक्षपदी अमोल सखाराम मरभळ यांची निवड झाली.
मात्र इतर ग्रामसमित्या ग्रामस्थांच्या माध्यमातून लवकरच
स्थापन होतील असेदेखील यावेळी सांगण्यात आले.
जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या योजनेची सविस्तर चर्चा,
रस्ते, दळणवळण, रोजगार, वीज यावरही चर्चा झाली.
दलित वस्ती अंतर्गत १५ टक्के निधीची पूर्तता, वाचनालयासाठी
पुस्तकांची मागणी, बेरोजगारी, नरेगा, याविषयी देखील चर्चा झाली.
पेसा निधीच्या माध्यमातून विविध योजनांच्या संदर्भात माहिती
देण्यात आली, व सविस्तर चर्चा झाली व ठराव मंजूर करण्यात आला.
अवैधरित्या सुरू असलेला दारू धंदा बंद करण्याचा ठराव या
ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी वरील विषयाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
सदस्य जनार्दन मरभळ, ग्रामसेवक असवले भाऊसाहेब यांनी या
ग्रामसभेला संबोधित केले.
या ग्रामसभेला कुलदिप कोकाटे ( पोलिस पाटील ), पांडूरंग
डावखर ( माजी सरपंच ), मनोहर कोकाटे ( माजी सैनिक ), दादाभाऊ मरभळ ( माजी तंटामुक्ती
अध्यक्ष ), सुभाष मरभळ, शिवाजी कोकाटे, विश्वास मरभळ, विजय पोटे, रविंद्र मरभळ, उत्तम
मरभळ, समिर तलांडे, नवनाथ आमले, बाळू खरात तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित
होत्या.
यानंतर ग्रामसभेचे आभार सतिश शिंदे यांनी मानले.
COMMENTS