प्रतिनिधी : प्रा.शरद मनसूख ( सर ) पुणे जिल्हा परिषद व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती जुन्नर व डॉ. मनोह...
प्रतिनिधी : प्रा.शरद मनसूख ( सर )
पुणे जिल्हा परिषद व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती जुन्नर व डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव यांचे समन्वयातून प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 17 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले.
सदर शिबिराचे उद्घाटन सावरगाव येथील नवनिर्वाचित सरपंच मा. दीपक बाळसराफ व मा.डॉ वर्षा गुंजाळ, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती जुन्नर, डॉ. जाहिद जाफरी, वैद्यकीय अधिकारी प्रा आ.केंद्र सावरगाव यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर शिबिरात महिला बचत गट, विद्यार्थी आणि नेत्र विकार असलेले रुग्ण इत्यादींची तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण 266 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. पैकी 95 लाभार्थ्यांना दृष्टी दोष आढळून आला व ते चष्मा घेण्यासाठी पात्र ठरले. तर 32 लाभार्थी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र झाले व इतरांना औषधोपचार व सल्ला देण्यात आला.
यावेळी डॉ. डोळ मनोहर मेडिकल फाउंडेशन, नारायणगाव येथील डॉ. विजय गायकवाड, अर्जुन माळवे, अमरदीप चव्हाण इत्यादींनी नेत्र तपासणीची सेवा बजावली.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय जाधवर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे, आरोग्य सहाय्यक श्री विजय दिवटे, शिवपुत्र कोळी, आरोग्य सहायिका श्रीमती सुनंदा पाचपुते, आरोग्य सेवक हनुमंत कवटे, वाहन चालक संतोष ढमढेरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अफसर शेख, ज्योती कोळसे, नम्रता साळवे व सर्व आशा कार्यकर्त्या यांनी विशेष योगदान दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे यांनी सूत्रसंचालन केले तर, गटप्रवर्तक श्रीमती पुनम शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.
COMMENTS