नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान चालताना पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे आज (दि.14) निधन झाले. काँग्रेस ...
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान चालताना पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे आज (दि.14) निधन झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत फिरत असताना त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आणि त्यांची प्रकृती खालावली.
या दरम्यान राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवली आणि तात्काळ हॉस्पिटल गाठले. परंतु त्यांचा यामध्ये मृत्यू झाला.
भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेस खासदाराच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.यात्रेत खासदार संतोष सिंह चौधरी हेदेखील राहुल गांधींच्या जथ्थ्यासोबत चालत होते. मात्र सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास संतोष सिंह चौधरी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागले. यात्रेतील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तत्काळ फगवाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संतोष सिंह चौधरी हे 76 वर्षांचे होते.
आज सकाळी 7 वाजता लुधियानाच्या लोदोवाल येथून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली. ही यात्रा जालंधरमधील गोराया येथे सकाळी 10 वाजता पोहोचणार होती, तिथे जेवणासाठी ब्रेक होणार होता. त्यानंतर दुपारी 3 वाजता हा प्रवास पुन्हा सुरू होणार होता आणि सायंकाळी 6 वाजता फगवाडा बस स्थानकाजवळ थांबणार होती परंतु या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.
आज यात्रेचा रात्रीचा मुक्काम कपूरथला येथील कोनिका रिसॉर्टजवळील मेहत गावात होता, मात्र आज सकाळी 9.30 च्या सुमारास काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाल्याने यात्रा थांबवण्यात आली आहे. मात्र, आज ही यात्रा थांबवली जाणार की राहुल गांधी पुन्हा यात्रेत सहभागी होणार याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
COMMENTS