सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग, समावेशित शिक्षण) यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिन (समता दिवस ) साजरा करण्यात आला. या निमित्ताने केंद्रस्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी गोळेगाव ता.जुन्नर जिल्हा पुणे येथे आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी संपर्क प्रमुख मा.श्री.बाळकृष्ण वाटेकर साहेब व गटशिक्षणाधिकारी
मा.सौ.संचिता अभंग मँडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आगर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री निवृत्ती बांगर साहेब यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत सर्वसामान्य जनतेत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रति सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रेरित करावे. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ छाया वाळुंज मॅडम, श्रीमती.जयश्री गवारी मॅडम, श्रीमती.राजश्री साळवे मॅडम व केंद्रातील श्री.यश मस्करे सर, दिपक मुंढे सर, मोहन नाडेकर सर, सविता जोशी मॅडम आणि शांताराम मोधे सर या सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले .सदर कार्यक्रमात समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभागाचे विशेष शिक्षक श्रीमती मुंढे जयश्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले व श्री . मनोज रोकडे सर.विशेष शिक्षक यांनी समता दिवस स्पर्धां विषयी मार्गदर्शन केले, सौ छाया वाळुंज मॅडम यांनी सुत्रसंचालन व स्पर्धा नियोजन केले. तसेच दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, दिव्यांग व्यक्ती व बालचमू उपस्थित होते. सदर कार्यक्रमानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या लिंबु चमचा, रंगभरण, वेशभूषा, बादलीत बॉल टाकणे इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शालेय वस्तू बक्षिस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. मुलांना जेवन व गोड खाऊ देण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ व दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.श्रीमती जयश्री गवारी मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी गोळेगाव शाळेतील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले
COMMENTS