क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे.बोतार्डे येथे हनुमान देवस्थान अखंड हरिनाम सप्ताह दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सुर...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे.बोतार्डे येथे हनुमान देवस्थान अखंड हरिनाम सप्ताह दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सुरू झाला असून या सप्ताहाला ६० वर्षे पूर्ण झाली असून ६१ व्या वर्षात या सप्ताहाचे पदार्पण होत आहे.
या सप्ताहातील दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ७ ते ९ पहिल्या दिवसाची किर्तन सेवा ह.भ.प.शांताराम महाराज शेळकंदे यांची झाली.
तसेच दुसर्या दिवशी म्हणजेच २९ डिसेंबर २०२२ रोजी जुन्नर तालुक्यातील नेतवड गावचे ह.भ.प.आत्माराम महाराज बटवाल यांची किर्तन सेवा संपन्न झाली.
तिसर्या दिवसाची किर्तनसेवा वडज गावचे नारायण महाराज चव्हाण यांची होणार आहे.
तसेच ह.भ.प.बालाजी महाराज म्हस्के, ह.भ.प.विजय महाराज ढवळे, ह.भ.प.स्वामी बेलनाथ महाराज ( पळस्टीका ), ह.भ.प.अर्जुन महाराज शिंदे ( जुन्नर ) व शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प.संतदास महाराज मनसूख ( एकनाथवाडी ) यांचे सकाळी ९ ते ११ जाहिर हरिकिर्तन होणार आहे.
तरी भाविकांनी या हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा.
COMMENTS