सहसंपादक- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) खानापूर ता:-जुन्नर - येथील शिवनेरी फाउंडेशन संचलित ‘ शिवनेरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ’ ला महारा...
सहसंपादक-
प्रा. प्रविण ताजणे ( सर )
खानापूर ता:-जुन्नर - येथील शिवनेरी फाउंडेशन संचलित ‘शिवनेरी
स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ ला महाराष्ट्र शासन
व
टाइम2ग्रो इन असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने पार पडलेल्या एज्युकेशन
समिट २०२२ मध्ये शालेय शिक्षण क्षेत्राततील उत्कृष्ट
कार्याबद्दल ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ देऊन सन्मानित करण्यात आले.
२५० हून अधिक सीबीएसई शाळांनी या एज्युकेशन समिट मध्ये सहभाग घेतला
होता. सदर कार्यक्रम हॉटेल ट्रायडंट, नरिमन पॉईंट,
मुंबई
या ठिकाणी शुक्रवारी संपन्न झाला. या कार्क्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून राज्याचे
शिक्षण मंत्री मा.दीपक केसरकर उपस्थित होते. शाळेच्यावतीने संस्थेचे सचिव श्री.
शुभंकर कणसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अशी माहिती प्रा.
राजेंद्र मुरादे यांनी दिली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या
अध्यक्षा डॉ.सौ.सरस्वती कणसे यांनी सर्व संस्थेचे पदाधिकारी ,प्राचार्य,शिक्षक,
शिक्षकेतर
कर्मचारी वृंद यांचे अभिनंदन केले.
COMMENTS