आरोग्य टिप्स - काजूमध्ये प्रथिने , लोह , जीवनसत्वे , पोटॅशिअम , झिंक , फॉस्फरस , मॅग्नेशिअम आणि कॉपर हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. काजूचे नि...
आरोग्य टिप्स - काजूमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. काजूचे नियमित सेवन त्वचेसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. तसेच काजूच्या सेवनामुळे आरोग्याच्या तक्रारीही दूर होतात. जाणून काजू खाण्याचे फायदे –
वेटलॉससाठी फायदेशीर
काजू
खाल्यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. नियमिपणे काजूचे सेवन
केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. काजूमध्ये असणाऱ्या ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे मेटाबॉलिज्म
लवकर होण्यास मदत होते. त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
त्वचा निरोगी आणि चमकदार बनते
काजूमध्ये
असणारे सेलेनिअम, झिंक, मॅग्नेशिअम, लोह आणि फॉस्फरस या पोषक
तत्वांमुळे त्वचेला नुकसान पोहोचवणारे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. त्यामुळे
त्वचा निरोगी होते आणि चमकदार बनते.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
काजूमध्ये
फायबरचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मात्र यासाठी
भिजवलेले काजू खावेत.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी
काजूमध्ये
ल्यूटिन आणि ॲंटी-ऑक्सीडेंट गुण असतात. काजूतील पोषक गुणधर्मांमुळे, सूर्यकिरणांमुळे डोळ्यांची
जी हानी त्यापासून संरक्षण मिळते. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते, दृष्टी चांगली होते.
बुध्दीवर्धक, स्मरणशक्ती वाढण्यासाठी
उपयुक्त
काजू
बुध्दीवर्धक, स्मरणशक्ती
वाढण्यासाठी उपयुक्त आहेत. काजूमध्ये ब्रेन बूस्टर पोषक घटक असतात, जे मेंदूची कार्यक्षमता
वाढवण्यास आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण वाढण्यासाठी मदत करतात.
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, मायग्रेनचा त्रास कमी होतो
काजूमध्ये
मॅग्नेशिअम तसेच जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर
नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तसेच काजूचे सेवन केल्यामुळे मायग्रेनच्या त्रास
कमी होतो.
हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी काजू
फायदेशीर
काजमूध्ये
असणारे मोनोअनसॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत
करते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
टीप : काजू शक्यतो भिजवलेले
खावेत. कारण भिजवलेले काजू लवकर पचतात. तसेच उष्णतेचे विकार असल्यास नियमित काजू
खाण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.
COMMENTS