आरोग्य टिप्स - मधामध्ये कॉपर , लोह , फॉस्फरस , मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम सारखी पोषक तत्वे असतात. मध हे आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक आहे. जाणू...
आरोग्य टिप्स - मधामध्ये कॉपर, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम सारखी पोषक तत्वे असतात. मध हे आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक आहे. जाणून घ्या मधाचे सौंदर्यवर्धक फायदे –
त्वचेसाठी मधाचे फायदे
मधामध्ये
असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते. त्वचा अधिक तरूण
दिसते. यासाठी कच्चे मध चेहऱ्याला लावून १०-१५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.
मधामध्ये असणाऱ्या अँटिइन्फ्लेमेटरी गुणामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यासाठी मदत
होते.
डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते
मध
आणि बदामाचं तेल समप्रमाणात मिक्स करून घ्या आणि डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर
हे मिश्रण लावा. १५- २० मिनिटांनंतर धुऊन टाका.
सूर्यकिरणांपासून संरक्षण
कोरफड
जेल आणि मध एकत्र करुन त्वचेवर लावल्याने सनबर्नपासून सुटका मिळण्यास मदत होते.
कोरड्या, फाटलेल्या ओठांसाठी गुणकारी
कोरड्या, फाटलेल्या ओठांची समस्या
दूर करण्यासाठी बदामाच्या पेस्टमध्ये मध मिसळा आणि ओठांवर लावा. असे नियमितपणे
केल्याने ओठ मुलायम बनतात.
केसांचा रुक्षपणा कमी होतो
केस
अत्यंत कोरडे असल्यास केसांना मध लावा आणि ३-४ मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा.
त्यामुळे केसांची चमक परत येईल. केस मुलायम होतील.
नैसर्गिक कंडिशनर
नैसर्गिक
कंडिशनर म्हणून तुम्ही मधाचा उपयोग होतो. यासाठी दोन चमचे नारळाच्या तेलात एक चमचा
मध मिसळा आणि केसांना हे मिश्रण लावा. १५- २० मिनिटांनंतर केस धुऊन टाका. यामुळे केस
मुलायम, मजबूत
आणि चमकदार बनतात.
COMMENTS