वि शेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एम.एच.टी. सी.ई.टी. २०२२ पर...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एम.एच.टी. सी.ई.टी. २०२२ परीक्षेमध्ये श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. यामध्ये अनुक्रमे कु. सोनवणे श्रद्धा संदीप ९८.२८%, कु. कुटे प्रसाद राजाराम ९७.६३%,कु. भगत साक्षी प्रदीप ९४.४४%, कु. पठाण शबनम नाजीर ९३.५६%, कु. रोकडे प्रीतम प्रकाश ९३.०८%, कु. दहिफळे गणेश शंकर ९१.९७ %, कु. नायकोडी ओम संतोष ९१. ८७%, कु. कवडे ईश्वरी संजय ९०.३३%, या विद्यार्थ्यांनी एम. एच. टी. सी. ई.टी. २०२२ परीक्षेमध्ये उज्वल यश संपादित केले. तसेच कु. हर्षा कैलास शिंदे या विद्यार्थीनीने जे.ई.ई. मेन्स परिक्षेमध्ये ९६. ६४ % मिळवले तसेच ती एन. आय.टी. मध्ये तीला प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ जुन्नर संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड.संजयराव शिवाजीराव काळे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही.बी. कुलकर्णी सर , प्रभारी प्राचार्य डॉ. दीपेंद्र उजगरे , उपप्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. पी.एस. लोढा पर्यवेक्षक प्रा. एस.ए. श्रीमंते, व्होकेशनल विभाग प्रमुख प्रा. के. जी. नेटके तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते सर्वांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
COMMENTS