बी ड: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे , या विवंचनेतून 20 व...
बीड: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून 20 वर्षाच्या तरूण शेतकऱ्याने घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
शेती न
पिकल्याने वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज व बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे
फेडायचे, या विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलले. घरी
कुणी नसल्याचे पाहून घरातील पत्र्याच्या लोखंडी आडूला दोरीच्या मदतीने गळफास घेऊन
आत्महत्या केली. केज पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे
शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आत्महत्याकडे वळत
असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. रविवारी एकाच दिवशी गेवराई तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल रानमारे (वय 24 रा. धोंडराई ता. गेवराई) व अर्जुन धोत्रे (वय 40 रा. भोगलगाव ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या दोघा
शेतकऱ्यांची नावे आहेत. दोन्ही शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले, यामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
अतिवृष्टी
आणि परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील औरंगपूर येथील
शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. नारायण
सुंदर पडूळे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे
कापसाचे पीक पाण्याखाली गेले बँकेचे कर्ज फेडायचे कसे या नैराश्यातून संबंधित
शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
COMMENTS