भोपाळ (मध्य प्रदेश): दीरासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून महिलेने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रीवा जिल्ह्यात घडली आहे. या...
भोपाळ (मध्य प्रदेश): दीरासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून महिलेने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रीवा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
महिलेने दीर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पतीची निर्घृणपणे हत्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पतीचं शीर धडापासून वेगळं केल्यानंतर घरामध्येच मृतदेह लपवला. जवळपास दीड वर्षांनी तिच्या या अमानुष कृत्याची माहिती उघड झाली आहे. संबंधित घटना ही रीवा जिल्ह्याच्या मऊगंज पोलिस ठाणे हद्दीतील उमरी गावात 2021 साली घडली होती. गावातील 40 वर्षीय रामसुशील पाल यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रामसुशील यांचे दुसरे लग्न रंजनासोबत केले होते. लग्नानंतर दोन वर्षांनी रंजनाचं तिच्या दीरासोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या या प्रेमसंबंधांची माहिती रंजनाच्या पतीला मिळाल्यानंतर वाद झाला होता.
रंजनाने दीरालासोबत घेऊन आपल्या पतीची हत्या करण्याचे ठरवले. रामसुशीलची हत्या केली तर त्याच्या वाटेची संपत्ती देखील आपलीच होईल, असा विचार रंजना आणि तिच्या दीराने केला होता. त्यामुळे त्यांनी रामसुशीलला मारण्याचा कट आखला. रंजनाने आपल्या पतीला प्रेमाने समोसा खाऊ घालण्याचे नाटक केले. तिने त्या समोश्यामध्ये उंदीर मारण्याचं औषध टाकले होते. रामसुशीलनने तो समोसा खाल्ल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यांनी रामसुशीलचा मृतदेहाचं शीर धडापासून वेगळं केलं आणि घरातच मृतदेह लपवला.
या दरम्यान गेल्या दीड वर्षात मृतदेहाचे सर्व अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे त्यांनी उरलेला मृतदेहाचा व्हिल्हेवाट लावण्याचं ठरवलं.त्यांनी विचार केला की आता मृतदेह पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे मृतदेह कुठेही जंगलात फेकून दिला तरी कुणाला समजणार आहे. त्यातूनच त्यांनी 25 ऑक्टोबरला भाटी येथील जंगलात मृतदेह फेकून दिला. त्यांनतर महिला उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर येथे निघून गेली. या दरम्यान मध्य प्रदेश पोलिसांना भाटी येथील जंगलात मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता.
पोलिसांनी अधिक तपास केला आणि एक पथक महिलेचा शोधासाठी मिर्जापूरला पाठवले. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. यावेळी तिने तिचा दीर, चुलत सासरा आणि इतर आरोपींची देखील नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS