सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : तळेरान गावातील माजी पोलीस पाटील यांची बिरसा ब्रिगेड जुन्नर तालुका उपाध्यक्षपदी सर्वा...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : तळेरान गावातील माजी पोलीस पाटील यांची बिरसा ब्रिगेड जुन्नर तालुका उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. देवराम गावकर यांना प्रशासनातील प्रदर्शिकास अनुभव आहे तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे. तळेरान गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रयत्न केलेले आहेत तसेच रस्ते, लाईट व इतर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तसेच लोकांना शेती विषयी मार्गदर्शन करण्यामध्ये ते अग्रेसर आहेत. या सर्व गोष्टींचा बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून समाजाला नक्कीच उपयोग होईल. सामाजिक विकासासाठी राजकीय विकासासाठी तसेच पुढील कारकीर्दीसाठी त्यांस आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य, बिरसा ब्रिगेड सह्याद्री तसेच समस्त आदिवासी समाजाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा...
COMMENTS