सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी भारतीय संस्कृतीतील ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी भारतीय संस्कृतीतील दसरा-दिवाळी सण आपल्या मायभूमीतील गड किल्ल्यांवर पूजन व दीपप्रज्वलन करून साजरा केले जातात.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी किल्ले शिवनेरी जुन्नर या शिवजन्मभूमी मध्ये सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स जुन्नर व शिवाजी ट्रेकर नारायणगाव या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून दिवाळी पहाट व दीपोस्तोव सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रम सादर करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पहाटे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थान व आजूबाजूचा परिसर दिव्याच्या प्रकाशात उजळून निघाला. जन्मस्थळ परिसरात छत्रपतींची छटा रांगोळीच्या माध्यमातून सादर करण्यात आली. कार्यक्रमात प्रेरणा मंत्र, धेय्य मंत्र, पोवाडा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाम घोषाची गारद देऊन कार्यक्रम साजरा केला. फुलांचे हार व सुशोभीकरण करण्यात आले होते. सह्याद्री वाईल्डलाइफ ट्रेकर्स जुन्नर व शिवनेरी ट्रेकर्स नारायणगाव या दोन्ही संस्थेचे सदस्य, जुन्नर तालुक्यातील नागरिक व काही पर्यटक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
COMMENTS