र त्नागिरी : घराच्या बेडरूममध्ये सुकांत सावंत याने पत्नी स्वप्नाली यांचा गळा दाबून खून केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. जि...
रत्नागिरी : घराच्या बेडरूममध्ये सुकांत सावंत याने पत्नी स्वप्नाली यांचा गळा दाबून खून केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. जिल्ह्यात गाजणाऱ्या या खून प्रकरणाचा तपास पोलिसांनी उघड केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित
आरोपी सुकांत सावंत वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत होता. वर्षभर
खुनाचा कट रचून सर्व पुरावे नष्ट करण्याचे नियोजन केले होते. पोलिसांना तपासादरम्यान
घराच्या जवळच थोडीशी राख आणि मृतदेह जाळलेल्या ठिकाणी ८ ते १० मानवी अस्थी
सापडल्या आणि त्यातून अनेक धागे जुळत गेले. खून घराच्या आवारातच झाल्याचे आणि
मृतदेह तेथेच जाळल्याचे त्यातून निष्पन्न झाले.
स्वप्नाली
यांची हत्या करून मृतदेह गवतात लपवला होता. सूर्यास्तानंतर त्याने मृतदेहाची
विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. दोन साथीदारांना सोबत घेत मृतदेहाची विल्हेवाट
लावली. बंगल्याच्या मागील बाजूस कोबा केलेल्या भागात गवत टाकण्यात आले. या गवतावर
मृतदेह ठेवून पुन्हा मृतदेहावर गवत टाकले. गवतावर पेट्रोल ओतून मृतदेह पेटवून दिला, असेही पोलिसांनी सांगितले. याबाबतचा पुढील
तपास सुरू आहे.
COMMENTS