मंचरः पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशाला शाळेची बस दरीत कोसळून ४८ विद्यार्थी शिक्षक, शिपाई जखमी झाले आ...
मंचरः पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशाला शाळेची बस दरीत कोसळून ४८ विद्यार्थी शिक्षक, शिपाई जखमी झाले आहेत. घोडेगाव पोलिस, ग्रामस्थ व इतरांनी जखमींना बाहेर काढले आहे.
सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव, ग्रामीण रुग्णालय मंचर व पुणे येथील हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. काही विद्यार्थ्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
पिंपळगाव घोडे मधील मुक्ताई प्रशाला या शाळेचे काही विद्यार्थी, शिक्षक व शिपाई असे ४८ जण गिरवली येथील आयुका दुर्बीण केंद्र प्रकल्प पाहून स्कूल बस क्रमांक एम एच १४ सी डब्ल्यू ३५५४ मधून परत येत होते. चालकाचे घाट रस्त्यामध्ये वळणावर नियंत्रण सुटल्याने बस शंभर फूट खोल असलेल्या दरीत पडली. बस चालकाचे नाव लीलाधर लाडके आहे.
ग्रामस्थांनी बस दरीत पडल्याचा आवाज ऐकून अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अजित शेठ काळे, सुरेश काळे, जयसिंग काळे, निळूभाऊ काळे, सरपंच क्रांती ताई गाढवे, सोमनाथ काळे, तहसीलदार रमा जोशी, गट विकास अधिकारी जालिंदर पठारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, स्थानिक ग्रामस्थ या सर्वांनी अपघातस्थळी मदत केली.
COMMENTS