पाटणा (बिहार): पाटणा येथील बायपास परिसरात क्लाससाठी निघालेल्या मुलीवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या आणि तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही ...
पाटणा (बिहार): पाटणा येथील बायपास परिसरात क्लाससाठी निघालेल्या मुलीवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या आणि तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
संबंधित घटना बुधवारी (ता. १७) घडली असून, व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'एक व्यक्ती रस्त्यावर उभा राहून मुलीची वाट पाहत परिसरात फिरत आहे. काही वेळानंतर ही मुलगी तिथे पोहोचते. ती या व्यक्तीकडे न पाहता रस्ता ओलांडून पुढे चालू लागते. तेवढ्यात आरोपी तिचा पाठलाग करतो आणि तिच्यावर गोळ्या झाडतो. क्षणभरातच मुलगी खाली कोसळते. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळ काढतो.' थरकाप उडवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
https://twitter.com/ANI/status/1560110149322567680?s=20&t=TYIonCkZZ4fHI3ofjLnlnA
दरम्यान, या घटनेत मुलीच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, प्रकृती गंभीर आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी सध्या व्हेंटिलेटरवर आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS