सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) पंचायत समिती कृषी विभाग जुन्नर यांच्या वतीने स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुसूर, तालुका - जुन्...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
पंचायत समिती कृषी विभाग जुन्नर यांच्या वतीने स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुसूर, तालुका - जुन्नर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जेष्ठ नागरिकांना ७५ फळझाडांचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना फवारणी करताना वापरल्या जाणाऱ्या ७५ सुरक्षा किटचेही वाटप करण्यात आले.
यावेळी कृषीभूषण शेतकरी जितेंद्र बिडवई यांनी शेतकऱ्यांना कीटकनाशकांचा सुरक्षित वापर व फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच मंडल कृषी अधिकारी दत्तात्रय जाधव यांनी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची व फळबाग लागवडी बाबतच्या योजनांची माहिती दिली. फुलशेतीतील पुरस्कार प्राप्त शेतकरी राजाराम चौधरी यांनी फुल शेती विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक गट विकास अधिकारी हेमंत गरिबे, कृषी अधिकारी श्री निलेश बुधवंत, मंडल कृषी अधिकारी श्री दत्तात्रय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशशेठ ताजणे, विस्तार अधिकारी कृषी लक्ष्मण झांजे, श्रीमती म्हसे , ग्रामसेवक प्रदीप खिल्लारी, कुसुरचे सरपंच दत्तात्रय ताजणे, उपसरपंच संदिप दुराफे, विविध कार्यकारी सोसायटी कुसुर चे चेअरमन राजेंद्र दुरफे , माजी उपसरपंच अजित ताजने, माजी सैनिक श्रीकृष्ण मल्हारी दुराफे, पोलीस पाटील ऋषिकेश ताजने आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांनी केले तर आभार अजित ताजने यांनी मानले.
COMMENTS