सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : भारतात सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना मनात आलेली कल्पना "भारतीय ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : भारतात सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना मनात आलेली कल्पना "भारतीय तिरंग्याचा इतिहास" 63 स्क्वेअर फुट रांगोळीच्या रुपात मांडण्याचा प्रयत्न नारायणगाव येथील सौ.अक्षदा रतीलाल बाबेल यांनी राहत्या घरात10 ते 12 तासात पूर्ण केला असून याला निळा, हिरवा, पिवळा, पांढरा, केसरी अशा विविध रंगाची 08 किलो रांगोळी लागली आहे.
गेल्या नऊ वर्षापासून घरगुती गणपतीची पर्यावरण पूरक सजावट करण्याचे काम चालू असताना मोठी रांगोळी काढण्याची कल्पना डोक्यात घोळत होती. ही रांगोळी सर्व भारतीय सैनिकांना समर्पित करीत असल्याची भावना सौ.अक्षदा रतीलाल बाबेल यांनी व्यक्त केली. दररोज घरात रांगोळी काढण्याची सौ.अक्षदा यांना अनेक वर्षांपासून सवय आहे. आपल्या अनेक 4 फूट बाय 4 फूट रांगोळीतुन त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे जसे बेटी बचाओ, बेटी पढाओ, रक्तदान, झाडे वाचवा, पाणी वाचवा असे अनेक संदेश त्यांनी दिले आहेत.
सन 1906 ते सन 1947 पर्यंत भारतीय ध्वजात कसे बदल झाले आहे ते 1906 ( कलकत्ता ), 1907 ( जर्मनी ), 1917 ,1921 ( आंध्र प्रदेश ), 1931 ( तिरंगी झेंडा आणि चरखा ) आणि 1947 ( तिरंगी झेंडा व अशोक चक्र ) हे दाखविण्याचा रांगोळीच्या माध्यमातून एक वेगळा प्रयत्न केला आहे .या वेगळ्या प्रयत्नाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.
कोरोना कालावधीत मनाला विरंगुळा मिळावा म्हणून विविध रंगी, विविध विषयांची रांगोळी काढण्याचा सराव केला त्यातून मनाला आनंद देता आला. स्वतःमध्ये असणारी कला वृद्धिंगत करता आली, तसेच व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून समाजातील अनेकांना या रांगोळीचा आनंद देता आला.
रांगोळी मध्ये विविध रंग भरताना दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सुखाचे, आनंदाचे विविध रंग भरता येतात हे यातून मला समजले व हा आनंद इतरांना देण्याचा मी आजवर प्रयत्न करीत आहे तो तसाच पुढे ठेवणार आहे. परिसरातील अनेकांनी या रांगोळीला भेट देऊन अक्षदा बाबेल यांचे कौतुक केले. ही रांगोळी काढताना मला माझे पती, प्रसिद्ध वक्ते प्रा. रतीलाल बाबेल यांची मोलाची मदत झाली असून त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला करता आले अशी भावना सौ अक्षदा बाबेल यांनी व्यक्त केली.
COMMENTS