ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये इंगळूण येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागांतर्गत आधु...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये इंगळूण येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागांतर्गत आधुनिक पध्दतीच्या यंत्राच्या सहाय्याने भात लागवड केली जात आहे.
उपविभागीय कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, तालुका कृषि
अधिकारी सतिश शिरसाठ, मंडल कृषि अधिकारी दत्तात्रय जाधव यांच्या नेतृत्वाखाली व
तंत्रज्ञान व्यवस्थापक सुर्यकांत विरणक व कृषि सहाय्यक दत्ता मडके यांच्या
मार्गदर्शनाखाली अर्जुन घोडे प्रगतीशील शेतकरी यांच्या सहकार्याने जुन्नर
तालुक्यातील अदिवासी डोंगरी भागातमध्ये यंत्राच्या सहाय्याने भात लागवडीचे प्रयोग
केले जात आहेत. तालुक्याच्या अदिवासी पश्चिम पट्यात भात हे मुख्य पीक आहे, या दरम्यान मजुरांची टंचाई, श्रम, वेळ व खर्च या सर्व गोष्टींची बचत होते.
तसेच आजची आपत्तीजन्य परीस्थीती असल्याने या यांत्रिकी पध्दतीने भात लागवड हे
वरदान ठरणार आहे. अशी माहीती सुर्यकांत विरणक यांनी दिली आहे.
COMMENTS