जळगाव : हॅलो मित्रांनो, मी आज आत्महत्या करणार आहे, प्लीज मला फॉलो करा, कमेंट करा, ओके बाय, असे म्हणत युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्ह...
जळगाव : हॅलो मित्रांनो, मी आज आत्महत्या करणार आहे, प्लीज मला फॉलो करा, कमेंट करा, ओके बाय, असे म्हणत युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता.
त्यानंतर युवकाने (वय २२) गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या वरच्या मजल्यावर युवकाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
धीरज शिवाजी काळे (वय २२, रा. हरिविठ्ठल नगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी (ता. १४) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केली. धीरजच्या आत्महत्येचा आणि त्याने सोशल मीडियात केलेल्या पोस्ट्सचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS