सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : श्री समर्थ शरद सुगम संगीत संस्था संचलित भारतीय सुगम संगीत महाविद्यापीठ अंतर्गत घेतल...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : श्री समर्थ शरद सुगम संगीत संस्था संचलित भारतीय सुगम
संगीत महाविद्यापीठ अंतर्गत घेतल्या गेलेल्या गीत-प्रारंभिक गायनामध्ये समर्थ
गुरुकुल, बेल्हे ( बांगरवाडी ) या सी.बी.एस.सी शाळेतील कु.समृद्धी
विवेक शेळके, कु.श्रीनिका वल्लभ शेळके व सानवी सतीश पाडेकर यांनी
विशेष प्राविण्य मिळवत यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
लहान वयातच
मुलांना आपल्या आवडीचे छंद जोपासता यावेत म्हणून समर्थ गुरुकुल मध्ये प्रवेश
घेतल्याबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर छंद, आवड आणि करियर
त्याचप्रमाणे कला, क्रीडा, शिक्षण आदी विषयांबाबतचे विशेष मार्गदर्शन देण्याचा
सातत्यपूर्ण प्रयत्न असतो.
या सर्वांचा
परिपाक म्हणून आज या शाळेत गायन स्पर्धेमध्ये सहभागी होऊन समृद्धी, श्रीनिका आणि
सानवी या तीन विद्यार्थिनींनी आपला छंद जोपासलेला आहे.
सदर
विद्यार्थिनींनी गायनाचे प्रारंभिक धडे राहुल दुधवडे यांच्याकडे घेतलेले असून याच
गायन क्षेत्रात आपला पुढील करियर करण्याचा त्यांचा मानस असल्याचे संगीत शिक्षक
राहुल दुधवडे यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष
वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक
शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तीनही विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले व
पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS