प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याचे मध्यवर्ती असलेले ठिकाण म्हणजे जुन्नर बस स्थानक या बस स्थानक परिसरात मोठ्या प्...
प्रतिनिधी : आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याचे मध्यवर्ती असलेले ठिकाण म्हणजे जुन्नर बस स्थानक या बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून गटारीचे पाणी साचल्यामुळे अक्षरश: दूरवरून तसेच ग्रामिण भागातून आलेल्या प्रवाशांना या गोष्टीचा नाहक त्रास सहण करावा लागत आहे.
बस स्थानकातील शौचायलयाकडे जाण्याच्या मार्गात मोठ्या प्रमाणात घाणीचे पाणी व चिखल साचल्यामुळे प्रवाशांना जाताना मोठी कसरत करून जावे लागत आहे.
दरम्यान, हि जबाबदारी नक्की कोणाची आहे? असादेखील प्रश्न पडतोय कारण, अद्यापही यावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, बस स्थानक प्रशासनाने वास्तविक या गोष्टीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, मात्र कित्येक दिवसांपासून या बसस्थानकातील हि अवस्था डोळेझाक करून न माहिती असल्याचेच कारण जणू पुढे येते की काय असाच सर्वसामान्यांना प्रश्न पडत आहे.
खर तर येथे खडी किंवा भरावा टाकून खड्डे भरले जावेत, कारण बस स्थानकात बस जाताना या पडलेल्या खड्ड्यातून जाताना बस देखील मोठ्या प्रमाणात आदळत असतात, मात्र याकडे लक्ष कोण देणार असाच प्रश्न पडतोय, जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असल्याने सध्या पर्यटक देखील जुन्नर नगरीत मोठ्या संख्येने येत जात असतात, त्यामुळे पर्यटकांना शौचायलयांकडे जाताना मोठी कसरतच करून जावी लागत आहे.
या गोष्टीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन यावर तातडीने कार्यवाही करावी अशीच प्रवाशांची माफक अपेक्षा आहे.
COMMENTS