उस्मानाबाद: दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला असून , पीडित मुलगी ही दोन महिन्याची गरोदर राहि...
उस्मानाबाद: दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला असून, पीडित मुलगी ही दोन महिन्याची गरोदर राहिली. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. एका शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या
अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. गेली अनेक दिवस हा नराधम शिक्षक या
मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिली. मुलगी स्कुटीवर
प्रवास करत असताना मुलीला अचानक रक्तस्रावाचा त्रास झाला. त्यामुळे पीडित मुलीच्या
घरच्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता मुलगी दोन महिन्याची गर्भवती
असल्याचे उघड झाल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
कुटुंबीयांनी
मुलीची विचारपूस केल्यानंतर शिक्षकाबद्दल माहिती पुढे आली. पीडितेच्या
कुटुंबीयांनी कळंब पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. स्वतः मुलीनेच या शिक्षकाविरोधात
जबाब दिला. या जबाबनुसार कळंब पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. शिक्षका विरोधात
पोक्सो आणि बलात्कार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात
हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहे.
COMMENTS