पुणेः राज्यातील विविध चौकात रस्त्यांवर व इतर ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांना ऑनलाईन स्वरुपात पोलिसांकडून ई-चलान पाठविले जाते. त...
पुणेः राज्यातील विविध चौकात रस्त्यांवर व इतर ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांना ऑनलाईन स्वरुपात पोलिसांकडून ई-चलान पाठविले जाते. तरी देखील वाहन चालक ई-चलानकडे दुर्लक्ष करून राजरोसपणे मोटर वाहन कायदयांतील नियमांचे उल्लंघन करत असताना दिसून येत आहेत.
निलेश बाळू जासूद (रा. चव्हाणवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) हा त्याच्याकडील स्विफ्ट कार नं. एम.एच. १२ एस.एन. ९८६० हीस ब्लॅक फिल्मींग करून शिरूर शहरामध्ये शनिवारी (ता. ३०) आला होता. सी. टी. बोरा कॉलेज, शिरूर येथे वाहतुक पोलिस सहा. फौज. चव्हाण व मपोना जाधव यांनी त्यास थांबवले. मोटारीच्या काचांना ब्लॅक फिल्मींग केली असल्याने सदर वाहनावर १,५०० रुपये रक्कमेचे ई-चलान पाठविले. त्यावेळी असे निदर्शनास आले की, सदर वाहनावर ठाणे, रायगड, शिरूर तालुका, पुणे शहर, पिंपरी चिंचवड या परिसरात वाहनाचे काचास ब्लॅक फिल्मींग करणे, वाहन नो पार्किंगमध्ये उभा करणे, वाहतूक पोलिसांचा इशारा न मानने वगैरे स्वरूपाचे मोटर वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याने १९/०२/२०२१ रोजीपासून ते आजपर्यंत एकूण २४,००० रुपयांचा रक्कमेचा दंड थकीत आहे.
ब्लॅक फिल्मींग मुळे सदर वाहनावर दंडात्मक कारवाई होवून देखील वाहन धारक कायद्यास न जुमानता पुन्हा सदर वाहनाचे काचास ब्लॅक फिल्मींग करून वाहन शहरामध्ये फिरवित असल्याचे दिसुन आले. त्यामुळे त्याच्याकडुन थकीत एकूण २४,००० रुपये दंडाची रक्कम ताबडतोप वसुली करून सरकारी तिजोरीत जमा करण्यात आलेली आहे.
शिरूर शहर व ग्रामीण परिसरातील नागरिकांना शिरूर पोलिसांकडून जाहिर आवाहन देण्यात येते की, आपण कोठेही वाहन चालवित असताना वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर आपणांवर ई चालानद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते व तो दंड अशा प्रकारे एक ना एक दिवस आपलेकडून वसुल करण्यात येतोच त्यामुळे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये व सुरक्षित प्रवास करावा.
संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मितेश घटटे, पुणे व उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, शिरूर यांचे मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहा, फौज. अनिल चव्हाण, मपोना बी. के. जाधव या टिमने केली आहे.
COMMENTS