कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी येथे बंद पडलेल्या कंटेनर उभा होता. मोटारीने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानंतर झालेल्या अ...
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी येथे बंद पडलेल्या कंटेनर उभा होता. मोटारीने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये 11 वर्षीय मुलीचाही समावेश असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी येथे आज (शनिवार) पहाटे भीषण अपघात झाला आहे. कंटेनरचा एक्सेल तुटल्यामुळे तो महामार्गावर उभा होता. यावेळी ट्रकला महिंद्रा कार जाऊन जोरात धडकली तर मोटारीच्या मागून येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रकही अपघातग्रस्त कारला मागून धडकला. या विचित्र अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. मोटारीमधील तिघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत सर्व बंगळुरू येथील एकाच कुटुंबातील आहेत.
दरम्यान, महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात ग्रस्ताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शिवाय, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS