प्रतिनिधी : गणेश गाडगे क्राईमनामा Live : निमगाव सावा थोरात मळा येथील स्वप्निल सदाशिव थोरात यांच्या कालवडीवर बिबट्याने रात्रीच्या वेळी ह...
प्रतिनिधी : गणेश गाडगे
क्राईमनामा Live : निमगाव सावा थोरात मळा येथील स्वप्निल सदाशिव थोरात
यांच्या कालवडीवर बिबट्याने रात्रीच्या वेळी
हल्ला केला या हल्ल्यामध्ये कालवड मृत्युमुखी पडली आहे. सदर घटनेचा पंचनामा
वनविभागाचे वन अधिकारी भालेराव साहेब यांनी केला आहे.
तरी सदर
शेतकऱ्यांनी रात्री आपली जनावरे बंदिस्त गोठ्यामध्ये बांधावी असे आवाहन भालेराव
साहेब यांनी केले आहे. सदर गावामध्ये याआधी देखील अशाप्रकारच्या घटना वारंवार
घडलेल्या आहेत. या ठिकाणच्या वस्तीवर पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत
आहे. याआधी देखील अनेक जनावरे बिबट्याने मृत्युमुखी पाडली आहेत. तरी शेतकऱ्यांनी आपली व आपल्या जनावरांची काळजी
घ्यावी अशी सूचना वनहक्क समिती अध्यक्ष गणेश गाडगे यांनी दिली.
COMMENTS