पाटणा (बिहार): मेव्हणीच्या लग्नानंतरही मेव्हणा तिच्या मोबाईलवर मेसेज आणि फोटो पाठवत राहिला. मेव्हणीच्या नवर्याने संबंधित मेसेज पाहिल्यानं...
पाटणा (बिहार): मेव्हणीच्या लग्नानंतरही मेव्हणा तिच्या मोबाईलवर मेसेज आणि फोटो पाठवत राहिला. मेव्हणीच्या नवर्याने संबंधित मेसेज पाहिल्यानंतर मोठा वाद झाल्याची घटना मधुनबनीमध्ये घडली आहे.
मेव्हणा आता गायब झाला असून, त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
एक युवक मेहुणीला तिचे लग्न झाल्यावरही दररोज मेसेज पाठवत होता. मेव्हणी मेसेज डिलीट करत होती. पण, एक दिवस मेसेज डिटील करायला विसरली आणि तिच्या नवऱयाने मेसेज वाचला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने थेट मेव्हण्याच्या घरी जायचे ठरवले. सोबत अनेकांना घेऊन गेला आणि समज दिली. पण, यानंतर मेव्हणा गायब झाला आहे. यानंतर मेसेज पाठवणाऱ्या युवकाच्या पत्नीने याची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
महिलेने तक्रारीत म्हटले की, 'पतीसोबत गुड्डी मोहल्ल्यात राहात असून, औषधाचे दुकान आहे. पतीने तिच्या लहान बहिणीला तिच्या लग्नानंतरही मेसेज आणि फोटो पाठवत होता. बहिणीला याचा त्रास होत होता. पतीला अनेकदा असे न करण्यासही सांगितल होते. पण त्याने काही ऐकले नाही. आता याची माहिती लहान बहिणीच्या पतीला मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. लहान बहिणीचा नवरा 3 जूनला सायंकाळी काही जणांना घेऊन आला होता. तेंव्हापासून पती गायब झाला आहे.' दरम्यान, याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS