पाटणा (बिहार): घरगुती भांडणामध्ये दोन भावजयांनी दिराच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्यामुळे दिराचा मृत्यू झाल्याची घटना भागलपूर जिल्ह्यात घ...
पाटणा (बिहार): घरगुती भांडणामध्ये दोन भावजयांनी दिराच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्यामुळे दिराचा मृत्यू झाल्याची घटना भागलपूर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृताचा भाऊ आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या मोठ्या भावाच्या मुलाचा आज (शुक्रवार) मुंडणाचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरात स्वच्छता केली जात होती. यावेळी मृत ध्रुवकुमार यांच्या पपईच्या झाडावर जड लाकूड पडल्याने ते झाड कोसळले. तुटलेले पपईचे झाड पाहून ध्रुवकुमार यांनी विचारणा केली. यानंतर दोन्ही भावजयांना राग आला आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
ध्रुवकुमारचा भाऊ आणि वहिनी या दोघांनी मिळून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान रागाच्या भरात दोन भावजयांनी त्याचा प्रायव्हेट पार्ट मुरगळल्यामुळे जागीच जीव गमवावा लागला. मात्र, मारहाणीनंतर त्याला रुग्णालयात घेऊन गेले होते. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पतीच्या मृत्यूप्रकरणी मृताच्या पत्नीने दोन दीर आणि त्यांच्या पत्नींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका जोडप्याला पोलिसांनी अटकही केली असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS