पुणे: नदी पात्रात बुडत असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने माय-लेकरांचा बुडून मृत्यू ...
पुणे: नदी पात्रात बुडत असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने माय-लेकरांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कामशेत (मावळ) येथील नायगाव येथे ही घटना घडली आहे.
माय-लेकरांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनम शिंदे आणि युवराज शिंदे अशी मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकरांची नावे आहेत.
आई पूनम शिंदे आणि मुलगा युवराज शिंदे हे दोघेही इंद्रायणी नदी पात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्याचवेळी युवराज हा पाण्यात पडला. मुलाला वाचविण्यासाठी आईनेही नदीत उडी घेतली. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. जवळच पूनम शिंदे यांचा भाऊ होता. त्याने दोघांना वाचविण्यासाठी धाव घेतली.
दोघांनाही बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ते दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. याबाबत पुढील तपास कामशेत पोलिस करत आहेत.
COMMENTS