तुळजापूर: रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या शेतरस्त्याच्या कामावर श्री तुळजाभवानी मंदिरात काम करणाऱ्या दोघांच्या नावे १५ हजे...
तुळजापूर: रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या शेतरस्त्याच्या कामावर श्री तुळजाभवानी मंदिरात काम करणाऱ्या दोघांच्या नावे १५ हजेरी पत्रके तयार करून ४१ हजार रुपये उचलून शासनाची फसवणूक केली आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील शिराढोण मसला ते आळजापूर या शेतरस्त्याचे काम रोजगार
हमी योजनेच्या माध्यमातून मंजूर होते. या कामासाठी सरपंच रुपाली देशमुख, ग्रामसेवक सचिन चौधरी, रोजगार सेवक ज्योतिबा
भिसे, विलास घोगरे यांनी
श्री तुळजाभवानी मंदिरात काम करणारे सुनील भिसे व विलास घोगरे यांच्या नावे १५
हजेरी पत्रके तयार केली आणि या माध्यमातून ४१ हजार १२२ रु उचलून शासनाची फसवणूक केली
आहे.
या प्रकरणी
गावातीलच संतोष सोनवणे यांनी तुळजापूर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली होती.
त्या वरून संबंधित पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS